उस्मानाबाद /प्रतिनिधी-

 शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा छताचा (स्लॅब) चा काही भाग कोसळला असून, भाजपा धाराशिवच्या वतीने आज दिनांक 28/06/2021 रोजी मध्यवर्ती बस स्थानकावर पूजा करून अभिनव पध्दतीने निषेध व्यक्त केला.

 एकाच पावसात धाराशिव बसस्थानकाचे छत जीर्ण  झाले व ते कोसळून पडले सुदैवाने पहाटेची  वेळ  असल्यामुळे प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा अथवा जीवित हानी झाली नाही, जवळपास 50 वर्षापूर्वीची ही इमारत पडून त्याठिकाणी अद्ययावत बसस्थानक उभे करावे, यासाठी नागरिकांची मोठी मागणी असताना याबाबत अद्यापही काहीच प्रक्रिया झाली नाही, मागील काळात सदरच्या बसस्थानकाच्या  ठिकाणी B O T तत्वावर  सुसज्ज बस्थानक निर्माण करण्याचे ठरले, त्यासंदर्भात भूमिपूजनही मोठ्या थाटामाटात करण्यात आले, महाविकास आघाडी सरकारच्या कार्यतत्परतेमुळे काम रद्द झाले असे समजते, या सर्व परिस्थितीमुळे आहे ती इमारत दुरुस्त हि करत नाहीत व नवीन ही इमारत बांधूनही देत नाहीत अशा विचित्र कात्रीत धाराशिव शहरातील प्रवासी जीव मुठीत ठेवून बसस्थानकाचा वापर करतात, सद्यस्थितीत बसस्थानकाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे, परिसरात खड्डे पडून धूळ व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे, आणि अशातच परवा  पहाटेच्या वेळी थोड्याशा पावसात बस स्थानकाचा छत (स्लॅब) कोसळल. त्या ठिकाणच्या सळया उघडया पडल्या याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी धाराशिव च्या वतीने ज्या ‍ठिकाणचा छत पडलेला आहे त्या ठिकाणी विधीवत पुजा अर्चा करुन प्रशासनाचा निषेध केला. व निषेधाच्या घोषणा दिल्या.  

एस.टी.प्रशासनाला व शासनाला सदबुद्धी मिळो व तातडीने रेंगाळलेले बसस्थानकाचे काम सुरू व्हावे ही सदिच्छा अपेक्षा भाजपा धाराशिवच्या वतीने व्यक्त करण्यात आली. जिल्हयात सध्या कामापेक्षा श्रेयाची जास्त चर्चा होत असताना सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या बसस्थानकाकडे लक्ष द्यावे ही अपेक्षाही व्यक्त केली, काम कोणालाही मिळू काम होणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित प्रवाशांकडून होत होती या प्रसंगी शहराध्यक्ष राहुल काकडे, सुजित साळुंके, सुरज शेरकर, प्रसाद मुंढे, शुभम माळकर उपस्थीत होते.

 
Top