उस्मानाबाद/ प्रतिनिधी

लोकतंत्र सेनानी संघजिल्हा उस्मानाबाद मधील आणीबाणीच्या तत्कालीन काळामध्ये 25 जुन 1975 मध्ये लोकशाहीचा गळा घोटणा-या तत्कालीन केंद्र शासनाच्या विरोधात तिव्र आंदोलन केले होते. त्या आंदोलन केलेल्या सत्यागृही सदस्यांच्या गौरव सन्मान पत्र देऊन केला. सभेच्या सुरुवातीस भारत मातेचे पुजन करुन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन केले. व त्यानंतर प्रमुख वक्ते जयंतजी डेहनकर यांनी मार्गदर्शन केले. व्हर्चुअल सभेस संबोधतांना स्वातंत्रया नंतरचा देशातील काळा इतिहास, आणीबाणीतील अत्याचार समोर आणला. मानवाधिकाराचे स्वतंत्राचे हनन करणा-या या काळाची कहानी आजच्या नवतरुणांपर्यंत माहीती पहोचवली आजचा तरुण हा लोकशाहीला माननारा समाज व्यवस्थे मध्ये सजक असणारा आहे, असेही डेहनकर यांनी सांगीतले.

या प्रसंगी बैठकीस जिल्हा युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी ऑनलाईन तसेच प्रत्येक्ष रित्या उपस्थीत होते. या बैठकीचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी भाजपा जिल्हा कार्यालय प्रतिष्ठाण भवन उस्मानाबाद येथे केले. या व्हर्चुअल सभेचे टेक्नीकल पर्सन म्हणुन प्रसाद राजमाने यांनी काम पाहीले. तसेच ऑनलाईन सभेस जिल्हा कार्यालयात प्रदेश कार्यकारीनी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, उप नगराध्यक्ष अभय इंगळे, नगर सेवक दाजी अप्पा पवार, प्रविण पाठक, ओम नाईकवाडी, सचिन लोंढे, सुरज शेरकर, सुजित साळुंके, अमीत कदम, बालाजी जाधव, गीरीश पानसरे, सुनील पंगुडवाले, गणेश येडके, प्रसाद मुंढे, अजीत खापरे, तेजस सुरवसे, ज्ञानेश्वर ढोरमारे, अक्षय विनचुरे तसेच शहरतील युवा मोर्चा व भाजपाचे पदाधिकारी ऑनलाईन तसेच प्रत्येक्ष रित्या सभेला पुर्णवेळ उपस्थीत होते.


 
Top