परंडा प्रतिनिधी : - तालूक्यातील खासगाव येथील स्मशानभुमी व गावठाणच्या जागेत तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून बोगस नोंदी लावुन महादेव लिमकर व नितीन लिमकर यांनी केलेले अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा गटविकास अधिकारी कार्यालयासमोर अंदोलन करण्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेच्या  वतीने देण्यात आला आहे.

दि.२४ जुन रोजी तहसिलदार परंडा व गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खासगाव येथील मशान भुमी व गावठाण च्या जागेत नितीन लिमकर, व महादेव लिमकर यांनी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून बोगस नोंद लावण्यात आली आहे. या अतिक्रमना  मुळे समशानभुमी साठी अडचण निर्माण झाली आहे या बेकायदेशीर नोंदीची चौकशी करून दोषी वर कारवाई करावी व अतिक्रमन काढण्यात यावे. तात्काळ  कारवाई नाही झाल्यास गटविकास आधिकारी यांच्या  कार्यालया समोर अंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

निवेदनावर राष्ट्रीय मानव आधिकार भ्रष्ट्राचार निर्मलन व बळीराजा शेतकरी संघटणेचे रमेश गणगे, राहुल गाढवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत निवेदनाच्या प्रति तहसिलदार परंडा पोलिस निरिक्षक यांना देण्यात आल्या आहेत. 

 
Top