उस्मानाबाद / प्रतिनिधी

उस्मानाबाद – लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील सहकार महर्षी शिवाजीराव नाडे यांचे अल्पशा आजाराने मुरुड येथील चांडक हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजीराव नाडे त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1926 रोजी झाला होता त्यांचे जन्मगाव खंडाळा तालुका लातूर हे होतं त्यांचे इयत्ता दहावी पर्यंतचे शिक्षण लातूर येथील व्यंकटेश विद्यालयामध्ये झाले बी.ए. च्या दुसर्या वर्षापर्यंतचे शिक्षण हे हैदराबाद येथे झाले तेथेच त्यांचे शिक्षण सुरू असताना हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला होता लातूर डी.सी.सी.बँकेचे चेअरमन, उस्मानाबाद जिल्हा परिषद उपाध्यक्ष, तेरणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तसेच सर्वात महत्वाचा विषय म्हणजे लातूर जिल्ह्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकावर शैक्षणिक गाव म्हणून ओळखले जाणारे मुरुड गावात त्यांनी जनता विद्या मंदिर मुरुड या नावाने शाळेची स्थापना केली सध्या सात हजाराच्या जवळपास या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत , तसेच त्यांनी मुरुडच्या सरपंच पदाचा पदभार सलग ३५ वर्ष सांभाळला लातूर ग्रामीण विधानसभेची निवडणूक त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या विरोधात एस. काँग्रेस कडून लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव फक्त २५० मताने झाला होता. 1952 ते 1970 पर्यंत बी. एस. एन. एल. कमिटीचे सदस्य होते मुरुड येथे पोल फॅक्टरी सुरू करून एकूण परिसरातील ६० खासगी संस्थांचा कारभार पाहत होते मराठवाड्यातील पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य , सरपंच ग्रामसेवक , तलाठी यांची ट्रेनिंग मुरूड येथे सुरू केली होती. विकासाबाबत कारभार कसा करावा यासाठी त्यांनी इथं ट्रेनिंग सुरू केलं होतं , लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात कोणती योजना आणायची असेल तर सुरवातीला मुरुडला येत होती नंतर लातूर आणि त्याच्यानंतर उस्मानाबाद असा घटनाक्रम होता. तेरणा साखर कारखान्याचे दहा वर्षे सलग व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. परिसरातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांनी मुरुड येथे शाळा सुरू केली त्या शाळेच्या उद्घाटनासाठी बाबासाहेब परांजपे आले होते त्यावेळी हैदराबाद मुक्ती संग्रामात नाडे यांनी सहभाग घेतल्यामुळे मुरुड येथील शाळे चे नाव परिसरामध्ये होते त्याची दखल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेऊन स्वतः मुरुड येथील शाळेस भेट दिली होती. नाडे यांच्यावर उद्या सकाळी अंत्यविधी होणार असून त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली व पत्नी, सुना ,नातवंडे ,असा परिवार आहे.

 
Top