परंडा / प्रतिनिधी - 

तालूक्यातील अवारपिपरी येथील पुलाच्या रेलिंग कामाच्या गैर कारभाराची चौकशी करून दोषीवर गुन्हे दाखल करावे अन्यथा मंगळवार दि.२९ जुन तिव्र अंदोलन करण्यात येईल,असा ईशारा राष्ट्रीय मानव अधिकार  भ्रष्ट्राचार निवारण व बळीराजा शेतकरी संघटणेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख रमेश गणगे यांनी दिला आहे .

तहसिलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना दि. २४ जुन रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनीक बांधकाम विभागाच्या वतीने अवारपिंपरी येथील पुलाच्या रेलिंग दुरूस्ती चे काम असताना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या संगण मताने  नवीन काम केल्याचे दाखवण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.या मुळे सार्वजनीक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.जो पर्यंत अवार पिपरी पुलाच्या रेलींग कामाची चौकशी होत नाही तो पर्यंत ठेकेदाराला  कामाचे  बिल देन्यात येऊ नये अशी मागणी करून  बोगस कामाची तात्काळ  चौकशी करून दोषी वर गुन्हे दाखल करावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

तसेच सार्वजनिक  बांधकाम विभागा मार्फत परंडा तालूक्यातील आसू ,लोणी व शिराळा रस्ता काम नियमा नुसार करण्यात येत नसुन कामाचे फलक लावण्यात आलेले नाही तसेच  आसू फाटा आसू या रोडवरील पुलाचे काम अर्धवट असून डांबरीकरण वाहुन गेल्याने  अपघात होण्याची शक्यता आहे या प्रकरणी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ  अभियंताकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असताना उडवा उडवी चे उत्तरे देण्यात येत आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

निवेदनावर बळीराजा शेतकरी संघटणेचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख  रमेश  गणगे , पाश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल गाढवे , यांचा स्वाक्षऱ्या आहेत या वेळी कार्यकर्ते उपस्थीत होते. निवेदनाच्या प्रति परंडा तहसील कार्यालय, जिल्हाधीकारी कार्यालय उस्मानाबाद, सर्वजनीक  बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, कार्यकारी अभियंता उस्मानाबाद, उपविभागीय अभियंता सा. बां. परंडा, व पोलीस ठाणे परंडा यांना देण्यात आल्या आहेत.


 
Top