उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे  अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या आदेशानुसार केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या पेट्रोल डिझेल व गॅस दरवढीच्या विरोधात मंगळवारी दि. ८ जून रोजी  युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान यांनी दिलेल्या अच्छे दिनाच्या आश्वासनाचा निषेध करत सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर विश्वजित पेट्रोलियम पंपामध्ये युवक काँग्रेसच्या वतीने उपस्थित ग्राहकाला लॉलीपॉप वाटप करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

निषेध कार्यक्रम युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अवधूत क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. तसेच केंद्र सरकारच्या विरुद्ध घोषणा बाजी करण्यात आली.  यावेळी शामराव भोसले ,अवधूत क्षिरसागर ,सौ. स्नेहलस्वामी ,अमोल बोडके ,नथुराम गायकवाड ,मारुती क्षिरसागर ,संजय खोसे,विजय नाईकवाडी, विनायराज देशमुख,ब ्रह्मानंद स्वामी, अमोल भालेराव, अक्षय क्षिरसागर, भीमराव भोसले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top