उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पतंजली योग समिती उसमानाबाद, आयुष्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय व नेहरु युवा केंद्र उसमानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ७ वा जागतिक योग दिवस ऑनलाईन व प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून उत्साहात साजरा करण्यात आला. 

कोरोना मुळे लोकांना एकत्र येण्यास बंधन असल्यामुळे आयुष मंत्रालयाने बनवलेला योग प्रोटोकॉल ऑनलाईन सादर करण्यात आला. या योग सत्राचे उद्घाटन जिल्हा आयुष अधिकारी डॉ गजानन परळीकर, जिल्हा क्रिडाधिकरी अशोक बनसोडे, नेहरू युवा केंद्र समन्वयक धनराज काळे,  पतंजली प्रमुख नितीन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चंद्रशेखर सुरवसे, कोरपे अण्णा, प्रवीण गडदे, मनोज पतंगे, नंदकिशोर ठाकरे, रविजीत देढे, बोरा, शंकर गोरे, अरविंद चव्हाण, भारत हिंगमीरे हे उपस्थित होते. योग प्रशिक्षण योग शिक्षक राम ढेरे व अनुरथ नागटिळक यांनी दिले. ऑनलाईन  चे काम प्रणव तावडे,  रुद्र ढोबळे, पार्थ पताळे या मुलांनी पाहिले. या ऑनलाईन कार्यक्रमात अनेक अधिकारी, कर्मचारी व योग प्रेमी देखील सहभागी झाले होते.

 
Top