उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अंगणवाडीत येणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्याबरोबर प्रत्यक्ष आचरणातून घडवावे,असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी म्हटले.

 अंगणवाडीत येणाऱ्या मुलांच्या बालमनावर शैक्षणिक साहित्य, चित्र, रंगरंगोटी, वस्तू, फळे,भाज्या,खेळणी आदींच्या माध्यमातून संस्कार केले जातात. या संस्काराबरोबरच प्रत्यक्ष आचरणातून,कृतीतूनही संस्कार करणे आवश्यक आहे.विज्ञानाने भरपूर प्रगती केली असल्याने त्याचाही उपयोग मुलांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी केला पाहिजे. अंगणवाडी सेविका,मदतनीस,पर्यवेक्षिका यांनी त्यांचे राहणीमान,भाषा,आचरण यातूनही मुलांवर चांगले संस्कार होतील याकडे लक्ष द्यायला हवे. 

     स्वच्छता,वृक्षारोपण,परसबाग अशा बाबी मुलांना आकर्षित करू शकतात.त्यामुळे दैनंदिन जीवनात संबंध येणाऱ्या महत्त्वपूर्ण बाबींचा सहजपणे समावेश शिक्षणात करता येईल, असे पाहावे. हलक्या फुलक्या पद्धतीने मात्र प्रभावी होईल, अशी शिकवण्याची पद्धत असण्याची अपेक्षा डॉ.फड यांनी यावेळी केली.त्यांच्यासोबत उपाध्यक्ष धनंजय सावंत,उपशिक्षणाधिकारी, कार्यकारी अभियंता देवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, गट विकास अधिकारी किशोर अंधारे आदी उपस्थित होते.

 
Top