वाशी / प्रतिनिधी- 

गॅसचा स्फोट होऊन एका 20 वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना वाशी येथे आज (21 जून ) रोजी दुपारी ३:३० वाजता घडली. गॅस गळतीमुळे आगीचा भडका उडाला व त्यामध्ये या तरुणीला आपला  जीव गमवावा लागला.

 वाशी येथील कॉलेज रोडवर असलेल्या शासकीय गोदामा जवळ असलेल्या वस्तीमध्ये सारिका सदाशिव क्षिरसागर वय 20 वर्ष ही आज (  २१ जून ) दुपारी ३:३० वाजता गॅस वर स्वयंपाक करत होती. स्वयंपाक करत असताना गॅस पाईप मधून गॅस लीक झाला. या पाईपमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाल्याने आगीचा मोठा भडका उडाला. या भडक्यामधे मुलीच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला व ती संपुर्णरित्या भाजून तिचा जागीच मृत्यू झाला. या आगीचा भडका एवढा मोठा होता की त्यामध्ये सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. सर्वत्र धुराचे   लोट पसरले. येथे राहणाऱ्या नागरिकांनी घराचे पत्रे काढून  घरामधे पाणी ओतले व येथे लागलेली आग विझवण्यात यश मिळवले.

    या संपूर्ण घटनेची पोलीस दप्तरी नोंद झाली असून पुढील तपास पो.उप नि. निरगुडे हे करत आहेत. गॅस दुर्घटनेमध्ये तरुणीचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

 
Top