उमरगा / प्रतिनिधी

महाराष्ट्रातील कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या मानधनावर काम करत असलेल्या नर्स,  वार्डबाॅय,   फार्मासिस्ट,टेक्निशीयन,डेटा एन्ट्री आॅपरेटर,स्टोअर आफिसर, आयुष डाॅक्टर,सफाई कामगार,अॅम्बयुलंन्स ड्रायव्हर,सुरक्षा रक्षक आदी ‘कोरोना योद्धे’ हे मागील कांही दिवसांपासून आक्रमक पवित्र्यात असल्याचे दिसून येत आहे.यांना शासनाने ‘कोरोना योद्धा’ ही सन्मानजनक उपाधी जरी देवून गौरविले असले तरी त्यांच्या कायम नोकरीचा,वेतन व शासकिय सोयी सुविधांचा त्यांना कोणताही लाभ मिळत नसल्यामुळे महामारी योद्धा संघर्ष समिती च्या माध्यमातून या योद्धयांनी आजवर राज्यभरात शेकडो आंदोलने करत आपल्या मागण्या वारंवार शासन,प्रशासन,समाज,माध्यमे,व समाजमाध्यमातून मांडल्या आहेत,खास कोरोनाशी लढण्याकरीताच या सर्व कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्वावर भरती करण्यात येवून,प्रत्येक वेळी तीन-तीन महिन्यांच्या तांत्रीक खंड देवून नियुक्ती आदेश दिले जातात,यांच्या वेतनाचा बाबतची माहिती घेतली असता अतिशय धक्कादायक माहिती समोर येते या लोकांना केवळ तिनशे ते आठशे रूपये रोजंदारी मिळते ती ही वेळेवर नाही, वेतनाबाबतही महीना-महीना उशीर लागतो,एकच पिपीई किट कमीत-कमी बारा तास वापरावे लागते,महीन्यातून केवळ चार ते पाच एन95 मास्क मिळतात,अशी माहीती समितीचे संस्थापक प्रमुख संतोष भांडे  यांनी दिली.

 भांडे म्हणाले की, अशा परिस्थितीत खरे-खुरे फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणारे कंत्राटी आरोग्य कर्मचारी नेमक्या काय आणि कोणत्या समस्यांचा सामना करून जनतेच्या आरोग्य रक्षणाची जबाबदारी पार पडताहेत,याची सरकार सह सर्वांना जाणीव करून देण्याकरिता,व या कर्मचाऱ्यांची सामाजीक आरोग्याकरीता असणाऱ्या गरजेबाबतची जागृती आणणेकरीता,तसेच तिन-तीन महिन्यांच्या नियुक्ती आदेश न देता या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीकरीता दिनांक २५ व २६ जून रोजी राज्यभरातील सर्व रूग्णालयात ‘जाणीव-जागृती चळवळ’ या अभूतपूर्व आंदोलनाचा इशारा समितीचे वतीने संतोष भांडे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, व विरोधीपक्ष नेते देवेंन्द्रजी फडणवीस यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला  आहे, निवेदनावर समिती संस्थापक प्रमुख संतोष भांडे सह प्रदेश उपाध्यक्ष दिपक लांडगे,सरचिटणीस अनिल मडके,अजित कसबे, प्रज्ञा सुरवसे, कविता तांबारे, सुनिता नाईकवाडे, अश्विनी गलांडे,सारीका मोटे,पुजा आगळे,आदी शेकडो कर्मचार्‍यांच्या सह्या असून,राज्यभरातील सर्व शासकीय,निमशासकीय,स्थानिक स्वराज्य संस्था,महापालिका,तसेच शासकीय महाविद्यालयांच्या सर्व रुग्णालयांत या आंदोलनाची जोरदार तयारी करणेत आली असल्याची माहीती पुढे आली आहे.

 
Top