उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारत निवडणूक आयोगाने पुरस्कृत केलेल्या SVEEP (SystematicVoter Education and Electoral) कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य शासनाचे विविध विभाग, शासकीय व अशासकीय संस्था,माहिती व जन संपर्क विभाग इत्यादी प्राधिकरणांचे सहकार्य घेणे अपेक्षीत असल्याने जिल्हा स्तरावर जिल्हा स्वीप (SVEEP) नोडल समिती गठित करण्यात आली आहे.या समितीवर नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी (मा.) गजानन सुसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा स्तरावरील जिल्हा स्वीप (SVEEP) नोडल समितीचे कामकाज करण्यासाठी तसेच जिल्हास्वीप (SVEEP) आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा स्तरावर जिल्हा स्वीप (SVEEP) चे नोडल अधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी (मा.) गजानन सुसर नेमणूक केली आहे.


 
Top