परंडा /प्रतिनिधी :  

पेट्रोल -डिझेलचे दर २५ टक्याने कमी करावे, अशी मागणी परंडा तालूका एमआयएमच्या वतीने केंद्रीय पेट्रोलीयम सचिव व महाराष्ट्राच्या विक्रीकर विभाग  यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.

दि.१८ जुन रोजी तहसिलदार परंडा यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकार पेट्रोलवर प्रतिलिटर ३३ रुपये तर डिझेलवर ३ रुपये कर अकारत आहे.तर राज्य सरकार पेट्रोल वर २५ रुपये तर डिझेलवर २२ रुपये कर आकारत आहे. यामुळे डिझेल, पेट्रोलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे.  राज्य व केंद्र सरकारने अकारण्यात आलेल्या करावर कपात करावी व २५ टक्के दर कमी करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुका अध्यक्ष जमील पठाण , मुक्तार हावरे ,अबुबकर काझी , आय्यूब डोंगरे ,आरीफ सय्यद यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top