तुळजापूर / प्रतिनिधी -

येथील जिजामाता नगर येथे घेण्यात आलेल्या कोरोना लसीकरण  शिबीरात परिसरातील १२१ नागरिकांना लस देण्यात आली. प्रथमता या केंद्राचे उद्घाटन  मुख्याधिकारी  आशिष लोकरे, नगराध्यक्ष  सचिन  रोचकरी , उपजिल्हा रुग्णालय  वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीधर जाधव,  विनोद  गंगणे ,  रुग्ण समिती सदस्य आनंदा दादा  कंदले , नगरसेवक माऊली भोसले आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी कार्यालयीन अधीक्षक वैभव पाठक, कृष्णा काळे, लेखापाल नगरपरिषद आदींची उपस्थितीती होती. यादरम्यान नगरपरिषद कर्मचारी त्याचबरोबर  समाजसेवक  संतोष इंगळे , विनायक बापू गुंड, श्री दीपक पलंगे,  किरण जाधव,संतोष झरकर  इत्यादींनी श्रमदान केले.

 
Top