उस्मानाबाद/ प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चार जणांविरुद्ध कारवाई करून गुन्ह्यातील माल, रक्कम व वाहन असे ९ लाख ९५ हजार ६०० रुपयांसह अटक करण्यात आली. ग

ोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक माने, पोलिस हेड कॉन्स्टेबल ठाकूर, काझी, पोलिस नाईक सय्यद, चव्हाण, पोलिस कॉन्स्टेबल सर्जे, जाधवर, मरलापल्ले, आरसेवाड, चापोना-कावरे, माने यांच्या पथक उस्मानाबाद जिल्ह्यात विविध भागात चोऱ्या करणाऱ्या आरोपींची गुप्त माहिती काढत होते. या आधारे पथकाने सोमवारी (दि. २८) जिल्हाभरातून भास्कर शहाजी शिंदे, सुंदर बबन शिंदे, तथन बबन शिंदे, आबा शहाजी काळे (सर्व रा. पारधी पिढी ईटकूर, ता. कळंब) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात कळंब पोलिस ठाणे, येरमाळा, ढोकी, वाशी, उमरगा, आनंदनगर ठाण्यातील दोन अशा आठ गुन्ह्यातील चोरीचा माल आढळला.


 
Top