उस्मानाबाद/ प्रतिनिधी

विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयातर्फे दहा आरोपींना सोमवारी दंडात्मक शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

कोविड- १९ संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या सहा आरोपींस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी शिक्षा सुनावली. यात तुळजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील युवराज अर्जुन माळी (रा. काटगाव) यास व तामलवाडी ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीस, आळणी येथील आगतराव किर्दत यांसह आंबी ठाण्याच्या हद्दीतील रफीक शेख व अनिल झिरपे यांना प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा तर परंडा ठाणे हद्दीतील रसुल तुटके याला २०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जुगाराप्रकरणी रंगराव व्यंकट चिवरे (रा. सास्तुर) यासही ५०० रुपये दंडाची तर बेंबळी हद्दीतील गोविंदिसिंग बायस (रा. ताकविकी) यासह अन्य एकास प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सोहेल रहमान शेख यांना १०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


 
Top