भाजप, सेना, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची मागणी

उमरगा/ प्रतिनिधी

उमरगा नगरपरिषदेच्या आर्थिक घोटाळयातील आरोपी सोबत काॅग्रेसचे दोन नगरसेवक व अनेक कार्यकर्त्यांची नांवे आहेत. उमरगा नगरध्यक्षानी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात कमावलेली संपत्ती बंगले, शेती, प्लॉट व वाहनाचा तपशील जाहीर करावा अशी मागणी उपनगराध्यक्ष, भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांनी केली आहे.

उमरगा नगरपरीषदेच्या नगराध्यक्षा आपल्या पतीच्या सहकार्याने अनेक कोटींचा भ्रष्टाचार व आफरातफर केलेल्या प्रकरणातील आम्ही तक्रारदार आहोत. नगराध्यक्षा टोपगे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकामध्ये नमुद केलेला घोटाला १ लाख ७५ हजार ४९ हजार ६२८ असल्याचे कबुल केले आहे. असे अनेक घोटाळे या नगराध्यांच्या काळात झालेले आहेत. त्यामुळे ते नगराध्यक्षपदावरुन पायउतार होणारच आहेत. तसेच त्यांच्या विरुध्द अनेक फौजदारी गुन्हे देखील दाखल होणार आहेत. यापुढे नगर परिषदेची आर्थिक हाणी झालेली आफरा तफरीमधील रकम देखील वसुल होणार आहे. म्हणुन उमरगा नगरपरीषदेशी संबंध नसलेले वैयक्तीक आर्थिक व्यवहाराचे भांडवल करुन आमचे खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे. जर सदर प्रकरणात आमची नाव असेल तर मग कॉग्रेसचे नगरसेवक विक्रम मस्के व नगरसेवक महेश माशाळकर यांची नावे तसेच इतर २० ते २५ कॉग्रेस नेते व कार्यकत्यांची नावे आहेत. त्याबददल त्यांनी खुलासा केलेला नाही. तसेच नगर परिषदेचे कोणतेही आर्थिक व्यवहार नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्या सहीनेच होतात. त्यामुळे आर्थिक व्यवहाराशीआमचा संबंध येतो कुठे. नगरध्यक्षा टोपगे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कमावलेली संपत्ती बंगले, शेती, प्लॉट व वाहनाचा तपशील जाहीर करावा. जर आम्ही दोषी आढळलो तर तात्काळ राजीनामा देण्यास तयार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या प्रसिध्दी पत्रकावर उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड, शिवसेनेचे गटनेते संतोष सगर, भाजपाचे गटनेते इराप्पा घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संजय पवार आदींच्या सह्या आहेत.

 
Top