उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतामध्ये खूप पूर्वीपासून योगासने, व्यायाम, साधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. येत्या २१ जून रोजी जागतिक योग दिवस आहे, याचेच औचित्य साधत महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र, विवेकानंद युवा मंडळ आणि नेहरू युवा केंद्र, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे. 

या योगदिनामध्ये होणाऱ्या योगांचे व्हिडिओ व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून पुरविण्यात येणार असून, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्रचे संस्थापक शेखरभाऊ मुंदडा व नेहरू युवा केंद्र उस्मानाबादचे जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे साहेब हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. युवकांनी यासाठी पुढाकार घेतला असून हे कार्य व योगासने व योग साधनेचे फायदे सर्वांना स्पष्ट करून सांगत आहेत. जागतिक योग दिनानिमित्ताने सर्वांनी योग साधना व योगासने सुरू करावेत व त्यांचे फोटो व व्हिडीओ शेअर करावेत व इतरांना देखील या योग दिनाचे नियोजनामध्ये सामील करून घ्यावे असे आवाहन विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी महेंद्रप्रताप जाधव, प्रतिक मगर, सुमित जानराव, प्रा.श्रीरंग जाधव, स्वप्निल देशमुख, अनिल देवकते व आदी युवकांचे सहकार्य लाभत आहे.

 
Top