तुळजापूर / प्रतिनिधी- 

 मदतीचा एक हात  या उपक्रमातंर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गंगणे यांच्या वतीने त्यांचे बंधु युवानेते विनोद गंगणे यांच्या हस्ते  पापनाश तिर्थ, विवेकानंद नगर,येथील रहिवाशांना  करोना लाँकडाऊनच्या पार्श्वभूमीवर  सरसकट ४२५  कुंटुंबाना पंचवीस जीवनाश्यक साहित्य असलेले कीट वाटप करण्यात आले. कोरोना संकट काळात शहरात जीवनावश्यक कीट दिल्याबद्दल नागरिकांनी युवा नेते विनोद गंगणे यांचा पुष्पहार घालुन सत्कार केला.

 यावेळी तुळजापूर नगरीचे युवा नेते विनोद गंगणे,मनोज गवळी,सुशांत हत्तीकर,वजेद तांबोळी,आनंद सिरसाट,मिलिंद सिरसाट,प्रहर्श बरुरकर,अविनाश वैरगे,समर्थ चौगुल्रे,पिनू तेलंग,अक्षय माने,आकाश माने,आशुतोष माने,सचिन वाघमारे, अर्थव भोरे, प्रतिक अम्बुरे, अभिषेक रेनके, अनुराग कोल्हे,पंकज जमादार,ओंकार लोंढे,अनिल वाघमारे,निसर तांबोळी, वाघमारे,पिन्टु रेनके,योगेश चौधरी,खन्दू सांळुके ,संजय जमादार,सोहएल शैख इम्रान तांबोळी आदींची उपस्थिती होती. 

 
Top