उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आली असून शेतकऱ्यांनी ८० ते ९० मिली मिटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. तसेच पेरणी करताना बी.बी.एफ. तंत्रज्ञान (रुंद-वरंबा-सरी) या पध्दतीचा सर्व शेतकऱ्यांनी अवलंब करणे आवश्यक आहे. अती पाऊस झाला किंवा पावसाचा खंड पडला तरी पीक उत्पादन घटण्याऐवजी त्यामध्ये वाढ होण्यास नक्कीच मदत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी बी.बी.एफ. पध्दतीच्या पेरणीचाच अवलंब करावा असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले. कृषी विभागाच्यावतीने लोहारा बु. येथे बिज प्रक्रिया करण्यात आली. बिज प्रक्रिया बी.बी.एफ. तंत्रज्ञान (रुंद-वरंबा-सरी ) वापर करून पीक उत्पादन वाढते. याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी एम.डी. माळी, कृषी पर्यवेक्षक रवि बनजगोळे, कृषी पर्यवेक्षक गोसावी, कृषी सहाय्यक सागर पिचे, नागेश जट्टे, शैलेश जट्टे, आय.डी. पाटील, सचिन चंडकाळे आदी उपस्थित होते.


 
Top