उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरात वृक्ष लागवड करण्यासाठी महिला मंडळांनी पुढाकार घेतला असून धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनच्या नेतृत्वाखालील  शहरातील 22 महिला मंडळांनी उपजिल्हाधिकारी श्रीमती रूपाली आवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे, कोरोना  महामारी च्या काळात ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात आले असून आपण पुढच्या पिढी करता हरित उस्मानाबाद या संकल्पनेतून वृक्ष लागवडीसाठी  काम करावे असे आवाहन श्रीमती आवळे यांनी  केले.

 या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चारुशीला देशमुख , श्री गायकर उपसंचालक सामाजिक वनीकरण तसेच महिला मंडळाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अष्टभुजा महिला मंडळ उद्योगिनी महिला मंडळ शताक्षी महिला मंडळ तेजस्विनी महिला मंडळ कालिकादेवी महिला मंडळ सावित्रीबाई महिला मंडळ प्रगती महिला मंडळ भावसार महिला मंडळ राजस्थानी महिला मंडळ ब्राह्मण महिला मंडळ सखी ग्रुप महिला मंडळ गणेश नगर महिला मंडळ भाषा संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान महिला मंडळ जैन महिला मंडळ एकता ग्रुप महिला मंडळ शांतिनिकेतन महिला मंडळ अर्थ ग्रुप महिला मंडळ जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळ बँक कॉलनी महिला मंडळ वुमन्स डॉक्टर असोसिएशन राष्ट्र सेविका समिती या बावीस महिला मंडळाच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. 

या बैठकीत महिलांनी वृक्ष लागवडीसाठी एकत्र यावे आपापल्या बचत गटाच्या महिलांना यात सहभागी करून घेऊन शहरातील मोकळ्या जागी तसेच नगरपालिका किंवा शासकीय जागांवर श्रमदान आणि वृक्ष रोपण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. महिला बचत गटाच्या महिलेने प्रत्येकाने एक झाड दत्तक घेऊन ते झाड जगवण्याची जबाबदारी घ्यावी तसेच घराच्या परिसरात कॉलनीत किंवा आपल्या गल्लीमध्ये वार्डमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षलावून  हरित उस्मानाबाद साठी काम करण्याचे आवाहन श्रीमती आवळे यांनी यावेळी उपस्थित महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केले.

या बैठकीस उपस्थित असलेल्या महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपण किती झाडे लावणार याची  संख्या जिल्हा प्रशासनाला सांगितली रोपांची  उपलब्धता आणि वृक्षारोपण करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.

 
Top