उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तृतीयपंथीच्या समस्यांच्या/तक्रारी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे.उस्मानाबाद जिल्हयातील तृतीयपंथीयांच्या समस्यांच्या/तक्रारीचे जलदगतीने प्रभावी नियंत्रण व निवारण करण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील रहिवाशी असलेले तृतीयपंथीय यांच्या नोंदी घ्यावयाच्या आहेत.

उस्मानाबाद जिल्हयातील तृतीयपंथीय व्यक्तींनी कार्यालयीन वेळेमध्ये सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण विभाग,उस्मानाबाद यांच्या कार्यालयास आवश्यक सर्व कागदपत्रासह संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरावत यांनी केले आहे.

 
Top