तुळजापूर/ प्रतिनिधी- 

नगरपरिषद ने  बुधवार दि. १६ रोजी शहरत प्लास्टिक बंदी मोहीम राबवुन त्यात  ३० किलो प्लास्टिक जप्त करून ३०००/- रु दंड ही वसूल करण्यात आला. ही कार्यवाही  मुख्याधिकारी आशिष लोकरे  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

या कारवाईमध्ये कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक,स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय साळुंके,प्लास्टिक बंदी पथक प्रमुख सुशांत गायकवाड,बिट प्रमुख गुणवंत कदम,विश्वास मोटे, वसुली विभागातील संतोष इंगळे,सज्जन गायकवाड, ज्ञानेश्वर टिंगरे,दत्ता डोंगरे, मुजाफर शेख, जयजयराम माने,लखन कंदले,शंकर कांबळे,महेश गायकवाड, मनोज हलकुडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी सहभाग होता. तसेच कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखता विनामास्क फिरणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात आली गर्दी करू नये,सर्वांनी मास्क लावावे,कामाव्यतिरिक्त बाहेर फिरु नये नियम पाळावेत अशा सूचनाही शहरातील नागरिकांना देण्यात आल्या.

 
Top