उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 हातलाई परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्यामुळे ते नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीचे केंद्र बनले आहे. ते उस्मानाबाद शहराचे फुफ्फुस आहे. नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करावी असे प्रतिपादन यशवंराव चव्हाण प्रतिष्ठानचे उस्मानाबाद अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी केले.

ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई विभागीय केंद्र उस्मानाबाद च्या वतीने शम्स उर्दू हायस्कूल परिसरात वृक्षारोपण समारंभ प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लईक शेख, आदित्य गोरे, लईक सरकार, गणेश खोचरे, बालाजी तांबे, मसूद शेख, मुजीब गुत्तेदार, मैनोद्दीन पठाण, मुख्याध्यापिका रेश्मा काझी, किरण निंबाळकर, डॉ.तबस्सुम सय्यद आदि उपस्थित होते.

गोरे पुढे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण करणे हि काळाची गरज आहे. राहणीमान उंचावण्यासाठी डोळस नजरेने चांगला विचार स्विकारावा. यासाठी शिक्षण हाच उपाय आहे.

जीवनराव गोरे यांच्या हस्ते शम्स उर्दू हायस्कूल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक डॉ.तबस्सुम सय्यद यांनी तर सुञसंचालन सोहेल शेख यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिक व शिक्षक उपस्थित होते. शेवटी उपस्थितांचे आभार सुरेखा जगदाळे यांनी मानले.


 
Top