उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून भूमी  अभिलेख विभागास   पुरविण्यात आलेल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशिनचे लोकार्पण येथील महसूल भवन येथे आज जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या  हस्ते करण्यात आले .                  

यावेळी  डिजीटल इंडिया मॉडर्नायजेशन प्रोग्रॅम अंतर्गत ई-फेरफार या प्रणालीतुन फेरफार झालेल्या मिळकत पत्रिका व डिजीटल साईन मिळकत पत्रिकांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री दिवेगावकर  यांच्या  हस्ते शेतकरी कुंटूबियांना सानुग्राह अनुदान वाटप करण्यात आले.  जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी लॉकडाऊनमुळे प्रलंबीत असलेली शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आदेश  त्यांनी दिले . 

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती स्वाती लोंढे, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी, उपअधीक्षक भूमी अभिलेख  ( उमरगा ) श्रीमती वैशाली गवई, उपअधीक्षक भूमी अभिलेख ( उस्मानाबाद) अशोक माने आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

 
Top