उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पंचायत समिती,उस्मानाबाद अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठया प्रमाणात केक, हार, बुके स्विकारले जातात ,त्यावर खर्चसुध्दा जास्त होतो,आंनदोत्सव साजरा केल्यानंतर हार,बुके हे फेकून दिले जातात,त्यामुळे मोठयाप्रमाणात कचरा गोळा होतो,तसेच पैसासुध्दा मोठया प्रमाणात वाया जातो.या सर्व बाबीचा विचार करुन अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये वृक्ष लागवड करण्याचे गोडी निर्माण व्हावी या उद्देेशाने  माझा वाढदिवस  माझा वृक्ष या संकल्पेतुन प्रत्येकांनी वाढदिवसानिमित्त एक वृक्ष लागवड करुन त्यांची संगोपन केले तर मोठया प्रमाणात वृक्ष लागवड होवू शकतो.म्हणून माझा वाढदिवस   माझा वृक्ष हे संकल्पना पंचायत समिती,उस्मानाबाद मध्ये राबविण्यात येते आहे. 

 त्यानुषंगाने  समृध्दी दिवाणे गटविकास अधिकारी पं.स.उस्मानाबाद यांनी  दि.17 जून रोजी माझ्या वाढदिवसापासुन पंचायत समिती उस्मानाबाद परिसरात वृक्ष लागावड करुन सुरु केला आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन दिवसेदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा -हास होत असल्याने तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत,यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे ऋतुमान बदलत चालले आहे,यावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संवर्धन,जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गांवाची भौतीक निर्मीती करणे ही काळाची गरज मानून उस्मानाबाद तालुक्यात वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धनास सर्वौच्च प्राधान्य देण्यात आले आहे, तालुक्यातील सर्व घटकांनी वृक्षरोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. 

 आपण वाढदिवस साजरा करताना वृक्ष लागवड करून करावा व राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन गटविकास अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी केले आहे.


 
Top