उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यस्तरीय आरक्षण हक्क कृती समिती मुबंई   यांच्या वतीने राज्यभरामध्ये एकाच वेळी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. दि. २६ जून रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय समोर  पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती ,पंतप्रधान, राज्यपाल , मुख्यमंत्री , यांना ओबीसींच्या विविध मांगण्याचे निवेदन पाठविण्यात आले आहे. 

 निवेदनावर बापू शिंदे , बशीर तांबोळी , हरिभाऊ बनसोडे , जगदीश जाकते, अनुरथ नागटिळक ,अभय यादव , विजय कांबळे , नागसेन शिदे ,  संजय धावारे , विजय गायकवाड , चंद्रकांत माळे , रामचंद्र शिंदे , प्रशांत माने ,  तिरुपती शेळके , श्रीमती सविता पांढरे , विलास ताकपिरे , सुखदेव भालेकर व इतर पदाधिकारी व शिक्षकांच्या यावर स्वाक्षर्‍या आहेत.


 
Top