चौगुले यांच्या आमदार निधीतून दिड कोटींचा निधी 

उमरगा  / प्रतिनिधी-

उमरगा - लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधीतून उमरगा शहरातील मुख्य रस्त्यावर पथदिवे व खांब बसवणे व ३० महत्वाच्या चौकांमध्ये उच्च प्रकाशदिवे बसवणे या कामांसाठी १ कोटी ५० लक्ष रुपये इतका निधी मंजूर झाला असून, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार प्रा.रवींद्र गायकवाड,

खासदार ओम राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील,आमदार चौगुले यांच्या  हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. 

यावेळी शिवसेनेचे जितेंद्र शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहयोद्दीन सुलतान, नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे, उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड,समाजसेवक डॉ.उदय मोरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, माजी नगरसेवक सिद्रामप्पा चिंचोळे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, संजय पवार, बालाजी पाटील, संदीप चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सूर्यवंशी, सचिन जाधव, शाहूंराज माने, शरद पवार, योगेश तपसाळे,संदीप चौगुले,लिंगराज स्वामी, खयूम चाकूरे, आप्पासाहेब पाटील, अमर शिंदे, बाजार समितीचे संचालक हणमंत डावरगे, व्यंकट पाटील, बालाजी जाधव, महावीर कोराळे, कंत्राटदार प्रवीण जाधव, नगरपालिकेचे विद्युत अभियंता दिनेश राऊत आदी उपस्थित होते. 

आमदार निधीतून उमरगा शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकावर, बसस्थानक ते श्रमजीवी महाविद्यालयापर्यंत पथदिवे व खांब बसविण्यात येणार आहेत. तसेच  जिजाऊ चौक शिवपुरी रोड, बाळासाहेब ठाकरे चौक, महादेव मंदिर समोर, मौलाना आझाद चौक हमीद नगर, समाज मंदिर समोर भीमनगर, झोपडपट्टी मध्यस्थानी, राजू कासार घराजवळ, प्रतिभा नगर, बसवेश्वर शाळेजवळ, अण्णाभाऊ साठे चौक, हुतात्मा बगीच्या मध्यस्थानी, बिरदेव मंदिराजवळ, कक्कया महाराज चौक, गौतम नगर, सय्यद बाशा दर्गा, समाज मंदिर कुंभार पट्टी, भारत नगर चौक, पोफळे दवाखाना आरोग्य नगर, इंदिरा चौक, गुंजोटी कॉर्नर रोड, जकापूर कॉलनी, गणेश मंदिर न्यू बालाजी नगर, गणेश चौक बालाजी नगर, साई मंदिर साई नगर, माउली मंदिर काळे प्लॉट, संतोषी माता मंदिरासमोर,  बालाजी मंदिरासमोर वडार वस्ती , मोईन मस्जिद कुंभार पट्टी, देवी मंदिर कुंभार वाडा  या ठिकाणी उच्च प्रकाशदिवे उभारण्यात येणार आहेत.


 
Top