वाशी / प्रतिनिधी-

खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टर ने देशातील पत्रकारा विषयी अपशब्द वापरून पत्रकारांना अपमानित केल्या बद्दल त्याचा वाशी तालुक्यातील पत्रकारांनी निषेध करून त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी वाशीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि वाशी शहारातील पेशाने डॉक्टर असणाऱ्या नितीन भराटे यांनी सोशल मिडियावरील स्वत : च्या फेसबुक अकाऊंट वरून देशातील पत्रकारांविषयी नागरिकांमध्ये व्देष निर्माण करणारी देशाला जर शांततेत जगताना पहायचे असेल तर प्रत्येकानेच एका पत्रकाराला जोड्याने हाणले तरच सुधारतील हे आणि देश शांत होईल.यांचा पत्रकरितेचा कंड शमवण्यासाठी भंपक  भडक बातमीदारी चालत आहे . अशा आशयाची संतापजनक पोस्ट टाकून पत्रकारांच्या भावना दुखावल्या आहेत . या कोराना महामरिच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात स्वत : च्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी नागरिकांचे प्राण वाचवले आहेत . ज्यामुळे वेळोवेळी प्रसारमाध्यमांनी याची दखल घेत जनमाणसात डॉक्टरी पेशाला पृथ्वीवरील देवाचा दर्जा मिळाला आहे . परंतू संबधीत पोस्ट करणाऱ्या डॉक्टर असलेल्या भराटे यांनी या देवाचा दर्जा प्राप्त झालेल्या क्षेत्रात विक्षिप्त मानसिकतेतून पोस्ट केल्याने पत्रकारांबरोबरच वैद्यकीय क्षेत्राची ही बदनामी होत आहे . अशा विक्षिप्त मनोवृत्तीच्या व्यक्ती विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाई करावी . अन्यथा वाशी तालुक्यातील सर्व प्रसारमाध्यमांच्या पत्रकारांच्या वतीने वाशी तहसिल कार्यालयासमोर कोरोनाचे सर्व नियम पाळून न्याय मिळेपर्यंत उपोषण करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले . यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुकुंद चेडे ,गौतम चेडे , ,नेतजी नलावडे , दादासाहेब लगडे ,  ,अजय वीर ,राहुल शेळके,,शोएब काझी  , विकास मुळे , कृष्णा  शिगंणे , बंडू मूळे , दत्तात्रय भराटे उपस्थित होते .


 
Top