उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 22 व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय येथे जीवनराव गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच  वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती बस स्थानक परिसर व जिजाऊ नगर येथे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा  वर्धापन दिन हा पुढील दहा दिवस  आरोग्य दिंडी  म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष  सुरेश दाजी बिराजदार यांनी केली. या आरोग्य दिंडी अंतर्गत पक्षाच्यावतीने विविध उपक्रम आरोग्य दिंडी दरम्यान आयोजित केले जाणार असल्याबाबत चे बिराजदार यांनी सांगितले.

  प्रसंगी पक्षाचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जि.प सदस्य महेंद्र दुरगुडे, माजी नगराध्यक्ष संपत आबा डोके, माजी जि.प. उपाध्यक्ष संजय दुधगावकर, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, प्रतापसिंह पाटील, महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा माडजे मगर, प्रदेश सचिव मसूद भाई शेख,युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, शहराध्यक्ष आयाज शेख, कार्याध्यक्ष सचिन तावडे,न.प. गटनेते गणेश बापा खोचरे,नगरसेवक प्रदीप घोणे ,बाबा मुजावर ,खलिफा कुरेशी ,इस्माईल शेख, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश तांबारे, संस्कृतीक सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष खालील पठाण, अमोल सुरवसे,नंदकुमार गवारे, कादर खान, तुरुप सर,गौस तांबोळी ,रणबीर इंगळे, लतीफ पटेल, युवा नेते मृत्युंजय बनसोडे, शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, मीनील काकडे, विद्यार्थी शहराध्यक्ष सौरभ प्रदिवराव देशमुख ,एस के इनामदार ,उस्मानाबाद युवक तालुकाध्यक्ष अमरसिंह देशमुख,अभि इंगळे उपाध्यक्ष , सागर चव्हाण, सुगत सोनवणे, राजाभाऊ ओव्हाळ,महेश सुरवसे, पुथ्वीराज मुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 
Top