उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. कोकण भाग वगळता इतर ठिकाणी सारख्या प्रमाणात तुरळक पाऊस पडत आहे.उस्मानाबाद जिल्हयात खरीप हंगामासाठी पूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. शेतकरी पेरणीच्या तयारीत आहेत. जिल्ह्यात काही महसूल मंडळामध्ये पेरणी योग्य पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये.असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

 अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड पडल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यावर जमीनीत पुरेशा खोलीवर ओलावा निर्माण होतो. तसेच पावसात खंड पडल्यास पीक तग धरू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये.सोयाबीन पिकाची पेरणी तीन ते पाच सेंमी खोलीवर करावी. पेरणीसाठी रुंद सरी वरंबा ( BBF) पध्दतीचा अवलंब करावा व पेरणीपूर्वी बियाण्यास बिज प्रकिया करुनच पेरणी करावी,असेही आवाहन यांनी केले आहे.

 
Top