उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती च्या वतीने covid-19 संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे अशा रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर  उपलब्ध करून दिले आहेत याचा लोकार्पण सोहळा भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे डॉक्टर अभय शहापूरकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री कमलाकर पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

उस्मानाबाद जिल्ह्यातील covid-19 बाधित रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर या  पाच मशीन ची सोय जनकल्याण समितीच्या वतीने करण्यात आली आहे गरजू रुग्णांना अल्पदराने या मशिन पुरवण्यात येणार असून जनकल्याण समितीच्या वतीने जिल्ह्यातील रुग्णांसाठी कोविड बाधित असलेल्या कुटुंबीयांतील कोरोना बाधित नसलेल्या मुलांसाठी संगोपन कक्ष तसेच कोविड  बाधित कुटुंबीयांसाठी जेवणाचे डबे पुरवण्याचे उपक्रम सुरु असल्याची  माहिती समितीचे उस्मानाबाद जिल्हा कार्यवाह एडवोकेट श्रीकृष्ण मसलेकर यांनी दिली. या कार्यक्रमाला जनकल्याण समितीचे उस्मानाबाद जिल्हा सहकार्यवाह एडवोकेट गिरीश पाटील , वैद्य गजानन कुलकर्णी , राजेश परदेशी , ऑक्सीजन कॉन्ट्रॅक्टर मशीन दाते ऋषिकेश धाराशिवकर यांची उपस्थिती होती.


 
Top