उस्मानाबाद / प्रतिनिधी-  उस्मानाबाद शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना देखील भरगच्च बाजार भरत असून या बाजारात अनेकजण विना मास्कचे  फिरत असल्याचे दिसत आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टंशींगचे पालन केले जात नाही, त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध घालावे, अशी मागणी मनसेचे दादा कांबळे यंानी केली आहे. 

शहरात कोरोणाचा मोठ्या प्रमाणावर प्रकोप चालूच असून रोज कितीतरी लोक मरत आहेत,बाधीत रुग्ण तर मोठ्या संख्येने सापडत असताना प्रशासन मात्र हातावर घडी तोंडावर बोट करून बसले आहे राज्य शासनाने कडक निर्बंध घातले असताना देखिल सकाळी आठवडा बाजार तुडुंब भरून जात आहे तसेच बाजारात (नेहरू चौकात) मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे बाजारात व्यापारी, ग्राहक विनामास्क बिनधास्त फिरत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यानंतर कोरोना खुप वाढत आहे,त्यामुळे प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळत आहे. 

तरी प्रशासनाने विनामास्क फिरत असलेल्या नागरिकांना कडक शासन करावे तसेच दैनंदिन बाजारात गर्दी होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, खबरदारी घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.

कोर्टा शेजारी ही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून कोरोनामुळे अत्तापर्यंत १२ वकीलांचा मृत्यू झालेला आहे. तरीसुध्दा दिलेल्या वेळेनंतर ही अनेक झेरॉक्स दुकाने चालू असल्यामुळे गर्दी होत आहे. न.प.चे दक्षता पथक पक्षपातीपणे दंड करीत असल्यामुळे प्रकाश स्वामी यंानी संताप व्यक्त केला आहे. 

 
Top