उमरगा / प्रतिनिधी- 

तालुक्यातील कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे आ. ज्ञानराज चौगुले व उपसंचालक आरोग्य विभाग, जि.लातूर डॉ.एकनाथ माले यांच्या उपस्थितीत विविध उपयोजना संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ऑक्सिजन, रेमडीसीवीर व बेड उपलब्धता याविषयी चर्चा करण्यात आली. 

तसेच माझे कुटुंब, माझी जबाबदारी यानुसार प्रत्येक गाव पातळीवर गावातील सर्व लोकप्रतिनिधी, बचत गट व आरोग्य विभागाचे कर्मचारी, भजनी मंडळ, यांची संयुक्त टीम करून कोरोना प्रतिबंधक जनजागृती मोहीम आखणे बाबत उपयोजना करण्याचे ठरवण्यात आले. प्रत्येक गावात प्रामुख्याने लहान मुले व वृद्ध नागरिक यांना कोरोना होऊ नये म्हणून यासाठी उपयोजना आखणेबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. तसेच उपजिल्हा रुग्णालय, उमरगा येथे लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीनेही  उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले, युवा नेते किरण गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक बडे, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके, डॉ.प्रविण जगताप, डॉ.विनोद जाधव, शरद पवार, योगेश तपसाळे आदी उपस्थित होते.

 
Top