उस्मानाबाद / प्रतिनिधी-                      

 सिंदगाव तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथील एका तरुणाने  कोरोणा झाल्यामुळे दि. ६ मे २०२१ रोजी दुपारी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यांच्याबद्दल संबंधित माहिती अशी की, आदल्या दिवशी त्यांचा मोठा भाऊ त्याला दवाखान्यात दाखवण्यासाठी आलूर या जवळच्या गावी घेऊन गेला तेथे डॉक्टरांनी त्याला करोनाची लक्षणे असल्याचे सांगितले व मोठे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास सांगितले मोठ्या भावाने (पस्तीस वय वर्ष ) असलेल्या पेशंटला घेऊन तो परत घरी गेला संबधित व्यक्तीला ४ लहान लहान  मूल आहेत , तेव्हा त्याने घरी कुटुंबासोबत चर्चा केली संबंधित पेशंटला घराबाहेर बाज टाकून झोपण्यास सांगितले व कुटुंबातील सर्व शेताकडे गेली तेव्हा पेशंटने भीतीपोटी तो देखील शेताकडे गेला आणि विहिरीवरील लाईटच्या बॉक्समध्ये हात लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नेमका लाईट गेली तेव्हा मरणाची विचार बाजूला गेले नाही परत त्याने कोरड्या विहिरीत उडी टाकली मध्ये झाडेझुडपे असल्याने तो मध्येच जाळीमध्ये लटकला त्याच वेळी कुटुंबातील एका व्यक्तीने पाहिले बघतो तर तो जाळी मध्ये अडकला होता थांब -थांब म्हणता त्यांनी जाळीतून परत खाली उडी मारली तेव्हा लोक जमा झाली आणि गावातील काही  तरुणांनी संबंधित  संबंधित व्यक्तीला विहिरीतून बाहेर काढले तेव्हा त्याच्या डाव्या हाताला आणि पायाला मार लागला होता आणि तो बेशुद्ध अवस्थेत होता तेव्हा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने प्रकाश मेला अशी चर्चा केली व त्याचा मृत्यू झाला म्हणून लाकडाची जुळवाजुळव केली. दरम्यानच्या काळात ही बातमी सिंदगाव गावचे तरुण तडफदार सामाजिक जाण  असलेला एक आदर्श सरपंच  विवेकानंद मेलगिरी तेथे पोहोचले व संबंधित व्यक्तीच्या अंगावरील चादर बाजूला करून स्वतः पाहणी केली तेंव्हा श्वास श्वास चालू आहे, असे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा सरपंच आणि संबंधित लोकांना खडे बोल सुनावले व 108 नंबर ला कॉल करून अंबूलन्स बोलून घेतले सरपंच आणि स्वतः एकटा कोरोना  पेशंटला शासकीय रुग्णालयात उस्मानाबाद येथे दाखल केले तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केला व सांगितले 100% हा पेशंट कोरणा पॉझिटिव आहे व उपचारानंतर पेशंट शुद्धीवर आला आणि ढसाढसा रडू लागला.

 त्या गावातील  डॉक्टर स्नेहा सोनकाटे  म्हणाल्या की,सरपंच  विवेकानंद  मिलगीरे यांनी देवदुता प्रमाण  काम केले संबंधित पेशंटला जीवदान दिले अशा या आदर्श सरपंचाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी  ग्रामीण भागात कोरोना संबंधीत भितीमुळे सोशल अवरेनेसची अत्यंत गरज आहे.अशा या काळात सर्वांनी माणुसकी दाखवली पाहिजे. सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा कार्यकर्ते या लोकांना आपल्या -आपल्या गावाची जबाबदारी ओळखून गावात जनजागृती करणे गरजेचे आहे. कोरोना आटोक्यात येईल गरीब पेशंट पैशाचा खर्च खर्चाच्या भीतीने पेशंट मेला तरी चालेल अशी मानसिकता होत आहे आणि लोक आत्महत्या करत आहेत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. कोरोना बरा होतो उपचार घेतले पाहिजे आणि शक्य असेल ते प्रयत्न केला पाहिजे. ८५ टक्के रिकोवरी रेट आहे शासन व्यवस्था सक्षम आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे कोणी ही घाबरून जाऊ नये आणि अशा प्रकारे आत्महत्या कोणी करू नये हे कुठेतरी थांबले पाहिजे या उदात्त हेतूने गावकरी लोकांचा विरोध पत्करून एका तरुणाचा ज्याप्रकारे सरपंच ने जीव वाचवला आशा या सरपंचाचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन डॉक्टर स्नेहा सोनकाटे (रा सिंदगाव तालुका तुळजापूर) यांनी केलेआहे. परंतु  सदर व्यक्ती  कोरोना झाल्यामुळे नैराश्य मध्ये होता अखेर त्या रुग्णाचे शनिवार दि.8मे रोजी निधन झाल्याची माहीती डाॕ.स्नेहा सोनकाटे यांनी दिली.

 
Top