कळंब /प्रतिनिधी : - 

कळंब शहर व तालुक्यात कोरोना चा वाढता प्रभाव पाहता कळंब शहर पूर्ण लॉकडाउन  करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी व सर्व व्यापारी संघटनेने एक मुखी केली आहे.

  कळंब शहरात गेल्या अनेक दिवसापासून कोरोनारचा फार मोठा उद्रेक झाला आहे.  यामुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. अशा परस्थिती  काही दुकाने शटर लावून तुम्ही थाप द्या आम्ही आत आहोत. असं म्हणत अनेकांनी आपले दुकाने चालू ठेवली. यावर दोन दिवसापूर्वीच कळंब चे तहसीलदार रोहन शिंदे यांनी बत्तीस दुकानावर कार्यवाही केली. परंतु कोरोना चा उद्रेक थांबवायचा असेल तर पूर्ण शहर लाँकडाऊन केले पाहिजे. असे सर्व पक्षीय नेत्यांनी व सर्व व्यापारी संघटनेने ठरवल्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे. यासंबंधीचे एक निवेदन कळंब

 च्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांना दिले आहे. या निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर,  भाजपाचे शहराध्यक्ष संदीप बाविकर, शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रदीप मेटे , नगरसेवक मुस्ताक कुरेशी , किरण हौसलमल ,रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सुशिलकुमार तिर्थकर, भाजपचे तालुका चिटणीस प्रशांत लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शंतनु खंदारे, संभाजी ब्रिगेडचे संघटक अतुल गायकवाड ,टिपू सुलतान ब्रिगेडचे उस्मानाबाद अध्यक्ष अकिब पटेल, छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संघ कळंब चे अध्यक्ष हर्षद अंबुरे, नगरसेवक मुस्ताक कुरेशी, प्रेमचंद गोरे आडत व्यापारी संघटनेचे शशिकांत फाटक अशा अनेक संघटनेच्या पदाधिकारी व सर्व पक्षीय नेत्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.


 
Top