उमरगा / प्रतिनिधी : -

 कोरोनाच्या संसर्गाची वाढत चाललेली साखळी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लावलेले असताना अत्यावश्यक सेवेतील दुकानांच्या वेळेत कापड दुकानांसह अन्य आस्थापना बंद दाराआड व्यवसाय सुरू असलेल्या आस्थापनावर धडक कारवाई मोहिमेतून उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांनी दंडात्मक कारवाई करीत आस्थापना सील केल्या.

उमरगा शहर आणि तालुक्यात कोरोना संसर्गाची लाट सुरू असताना त्यात रूग्ण संख्या व मृत्युचे प्रमाण वाढतच आहे. अशा स्थितीत प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधाच्या काळात दुकानदारांची मक्तेदारी नागरिकांच्या बेफिकीरीकडे पोलिस, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असताना बुधवारी झालेल्या मोठ्या कारवाईसाठी यशस्वी ठरला. उमरगा शहर व तालुक्यात यंदाच्या वर्षात कोरोना संसर्गाचा वेग चौपटीने वाढला आहे. फेब्रुवारी, मार्चनंतर एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांची संख्या २०५३ पेक्षा अधिक झाली असून १२३ मृत्यू झाले. प्रशासनाने वाढता संसर्ग रोखण्यासाठी जनता कर्फ्यू व  लॉकडाउन, संचारबंदी लागू केली परंतु बऱ्याच दुकानदारांकडून आदेशाचे पालन होत नव्हते. अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजीपाला व फळे सकाळी सात ते अकरापर्यंत सुरु असताना मुख्य बाजारपेठेतील कापड व्यापारी, सराफ व्यापारी, जनरल स्टोअर्सचे दुकाने छुप्या पद्धतीने सुरु ठेवण्यात येत होती. उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, पोलिस निरीक्षक मुकुंद अघाव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, नगर पालिकेचे अधिक्षक तुळशीदास वऱ्हाडे, नगर अभियंता डी पी राऊत, कर्मचारी करबस शिरगुरे,शेषेराव भोसले, किरण क्षीरसागर, सलीम सास्तुरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने बाजारपेठेत धडक कारवाईला सुरूवात केली. बाजारपेठत शामकुमार द्वारकादास कापड दुकान, स्वागत कलेक्शन, लाईफ स्टाईल, गुडलक जनरल स्टोअर्स, विजय लक्ष्मी ज्वलर्स, सिद्धी इलेक्ट्रीकल्स,विर मेन्स फँशन यासह दहा दुकाने पालिकेने सिल केले असून दुकानदाराकडून प्रत्येकी दहा हजाराचा दंड वसुल करण्यात आल्याने गुरूवारी (०६) प्रथमच लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत होता.


 
Top