परंडा / प्रतिनिधी : - 

 शासन स्तरावरून दि.२० मार्च २०२१ पासून बीडीएस प्रणाली (बजेट डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम)बंद होती.ती चालू करण्याचे अनुषंगाने वित्त सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडे निवेदनाद्वारे ई-मेल च्या माध्यमातून प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना सातत्याने पाठपुरावा करत होती.मार्च २०२१ पासून भ.नि.नि रक्कम मागणी प्रस्ताव रखडलेले होते.शिक्षकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता,कोरोनाने संक्रमित झाल्याने दवाखान्यात उपचार घेत असलेल्या आपल्या मुलाबाळांचे,पत्नीचे, किंवा स्वत:चे बील भरण्यासाठी पैसे नव्हते, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या भ.नि.नि.रक्कमा शासनाकडे  अडकून पडल्या होत्या त्यामुळे शिक्षकां समोरआर्थिक संकट उभे राहिले होते.

दि.६ मे २०२१ रोजी अखेर बीडीएस प्रणाली चालू झाल्याने शिक्षकांचे रखडलेले जीपीएफ(भ.नि.नि.) रक्कम मागणी प्रस्ताव निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीडीएस प्रणाली चालू करण्यासाठी राज्याध्यक्ष विकास घुगे, कृष्णा बोदेले, संजय बागडी, संतोष राजगुरू, दत्तात्रय पुरी यांनी वित्त सचिव मंत्रालय मुंबई यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानेच बीडीएस प्रणाली चालू झाली.अशी माहिती जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा समन्वयक फिरोज शेख, जिल्हा सचिव दत्तात्रय राठोड, कार्याध्यक्ष विशाल अंधारे, कोषाध्यक्ष रघुनाथ दैन, उपाध्यक्ष हनुमंत माने, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गोरे, जिल्हा प्रवक्ता धनंजय आंधळे, जिल्हा संघटक योगेश चाळक, महिला आघाडी प्रमुख सुषमा सांगळे-वनवे मॅडम यांनी दिली.


 
Top