उमरगा / प्रतिनिधी : -

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या काळात लहान मुलांपासून युवक आणि वयस्कर नागरिकांचे वाचना च्या सवयींपासून दूर राहण्याचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी वाचन संस्कृती जपली पाहिजे. त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ग्रंथालय, वाचनालयाची निर्मिती गावागावात झाली पाहिजे. यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. रोटरी क्लबच्यावतीने हाती घेण्यात आलेला रोटरी ग्रंथालय उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या शकुंतला मोरे यांनी व्यक्त केले.

कोरोना लॉक डाऊनच्या काळामध्ये पुस्तकाशी मैञी व्हवी, वाचन संस्कृती वाढावी, मुलांचे व युवकाचे मनोधैर्य वाढावे यासाठी रोटरी ग्रंथालये सुरु करत आहे. या ग्रंथालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणारी ग्रंथ-कादंबरी, वाचनीय  तसेच महाविद्यालयीन युवकांसाठी नकारात्मकता,  मरगळ, दूर करुण, प्रेरणा व प्रोत्साहन देणारी पुस्तके आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षेची पुस्तके संकलित करुन ग्रामीण भागात उपलब्धा केली जाणार आहे रोटरीच्या पुस्तक संकलन आवाहनास प्रतिसाद देत बुधवारी (दि ०५) उद्योजक लक्ष्मणराव मोरे, शकुंतलाताई मोरे यांनी लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धार्मिक ग्रंथ, कथा, कादंबरी, मासिके व शकुतला मोरे यांच्या स्वलिखित १५० पुस्तके रोटरी ग्रंथालयास क्लबच्या अध्यक्ष कविता अस्वले, सचिव अनिल मदनसुरे, क्लब ट्रेनर डॉ संजय अस्वले यांच्या कडे सुपूर्द केली. यावेळी रोटरी क्लबच्यावतीने श्री व सौ मोरे दांपत्याचे अभिष्टचितन करून शुभेच्छा देण्यात आल्या.


 
Top