मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांनी दिली प्रहार शिक्षक संघटनेला ग्वाही
परंडा / प्रतिनिधी : -
भविष्य निर्वाह निधी (जीपीएफ) सन-२०२०-२१ च्या हिशोबाचे विवरणपत्र (स्लिप) २५जून२०२१संबंधित शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना मिळाव्यात या विषयी मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ.सुरेश केंद्रे यांना देऊन सकारात्मक चर्चा केली.
शिक्षकांचे मुला-मुलींची उच्च शिक्षणासाठीची एडमिशनस् सरासरी जूलै-ऑगस्ट मध्ये असतात, तसेच लग्न कार्यासाठी पैशाची अत्यंत गरज असते.त्यादृष्टिने भ.नि.नि.जीपीएफ रक्कम मागणी प्रस्ताव दाखल करण्यासाठी जीपीएफ स्लिपा लवकर मिळणे आवश्यक आहेत.
यावेळी चर्चा करताना ३० जून अखेर जीपीएफ स्लिपा सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळून जातील असे संघटनेला आश्वासित केले.
जरी कोणत्याही शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आत्ता जीपीएफ रक्कम मागणी प्रस्ताव दाखल करायचे असतील तरी मागील सन २०१९-२० च्या स्लिप वरील ३१ मार्च अखेरची शिल्लक आणि ३१ मार्च २०२० ते आजपर्यंत कपात झालेला जीपीएफ हप्त्याचे शेड्युल तक्ता जमा रक्कम यांची एकूण जमा शिल्लक च्या ७५ टक्के रक्कम काढता येते त्यामुळे ज्यांना पैशाची निकड आहे.त्यांनी प्रस्ताव दाखल करायला काहीच हरकत नाही.मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुरेश केंद्रे यांचे म्हणणे आहे.
यावेळी सहाय्यक लेखाधिकारी शरद माळी, सुनिल सोनवणे, प्रहार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष वैजीनाथ सावंत, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल अंधारे, जिल्हा नेते संतूक कडमपल्ले आदि उपस्थित होते.