परंडा / प्रतिनिधी : -
तालुक्यातील खासगाव चे रेशन दुकानदार हे कार्ड धारकांना एप्रील महिन्याचे मोफत धान्याचे वाटप करीत नसल्याने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी परंडा येथील कार्ड धारकांनी दि.२५ रोजी तहसिलदार यांच्या कडे केली आहे .
परंडा येथील स्वस्त धान्य दुकान क्र.६ खासगाव येथील दुकानदार यांना जोडण्यात आले आहे. त्यांनी परंडा येथील सर्व कार्ड धारकांना एप्रील व मे माहिन्याचे धान्य दिले नाही.
तसेच परंडा येथील कार्ड धारकांना परंडा येथेच धान्य वाटप करणे गरजेचे असताना काही कार्ड धारकांना खासगाव येथे धान्य वाटप केले परंतू साखर वाटप केली नाही.
कोरोना च्या महा मारीत लॉक डाऊन मुळे गरीबांचे हाल होत असुन तात्काळ धान्य वाटप करन्याचे आदेश दुकानदारास देण्यात यावे व या प्रकरणाची चौकशी करून दुकानदारा वर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर रफीक शेख , शब्बीर कुरेशी , आतीक डोंगरे , इमाम शेख , रियाज सिकलकर , उस्मान शिकलकर, फकीर शिकलकर, ताहेर शिकलकर ,असलम शिकलकर , इलाही शिकलकर, राजू शिकलकर, वसीम शिकलकर , आहेमद शिकलकर, आजम सय्यद , बाळू बनसोडे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.