उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील तांबरी विभागातील रहिवाशी,  तरुण प्राध्यापक डॉ.प्रशांत ज्ञानेश्वर धावारे यांचे कोरोनाने नुकतेच निधन झाले. ते ३५ वर्षांचे होते. 

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसरातील जैव तंत्रज्ञान विभागात कंत्राटी तत्त्वावर प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर ‘कोविड’ने आजारी असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. यातच शनिवारी (दि. आठ) त्यांचे निधन झाले. गेल्या वर्षी जून महिन्यात त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, आई- वडील असा परिवार आहे. दरम्यान, विद्यापीठ उस्मानाबाद उपपरिसरतर्फे संचालक डॉ डी के गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.११) ऑनलाईन शोकसभा घेऊन डॉ. धावारे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विभागप्रमुख डॉ जितेंद्र कुलकर्णी यांच्यासह प्राध्यापक यात सहभागी झाले.


 
Top