दक्षता फाउंडेशनचे कोरोना काळातील कार्य कौतुकास्पद

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे गौरवोउद्गार


बेंबळी 
- बेंबळी येथे दक्षता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या काळातील केलेले कार्य कौतुकास्पद असून गाव व परिसरातील कोरोना निर्मुलनासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले.

बेंबळी गावात सोमवारी भेट देण्यासाठी आल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी सुरूवातीला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली. तेथील माहिती घेतल्यानंतर यावेळी त्यांनी दक्षता फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष गालिब पठाण व विश्वस्थ अॅड. उपेंद्र कटके यांनी कामाची सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अन्नधान्य किट्सचे वाटप, साडेतीन टन द्राक्ष वाटप, मास्क, सॅनेटायझर वाटप, गावात केलेली जनजागृती तसेच सुरुवातीच्या टप्प्यात सुरू केलेले कोविड केटर सेंटर आणि सध्या ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या समवेत सुरू केलेले आयसोलेशन सेंटर संदर्भात माहिती दिली. यावेळी तीन्ही प्रमुख अधिकाऱ्यांनी दक्षता फाउंडेशनच्या केलेल्या कार्याचे काैतुक केले. गावातील परिस्थितीबद्दल त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच यावेळी दक्षता फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर, मुबलक प्रमाणात स्टाफ उपलब्ध करणे, ग्रामीण रुग्णालय तातडीने कार्यान्वित करणे, गावात ऑक्सिजन बेडची व्यवस्था करणे आदी मागण्या करून चर्चा केली. तेव्हा जिल्हाधिकाऱी दिवेगावकर यांनी यासंदर्भातील सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांना नियोजन करण्यास सांगितले. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या पाहणीसाठी वेगळा दौरा नियोजित करण्याबाबत आदेश दिले. तसेच कंत्राटदाराला नोटीस पाठवून उर्वरित कामे करावीत, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याबाबतही सूचित केले. ऑक्सिजनची मागणी केल्यावर त्यांनी दहा बेड तातडीने उपलब्ध करणार असल्याचे सांगितले. तसेच डॉ. रोहित राठोड यांनाही अडचणी विचारून त्यांनी यासंदर्भात सूचना दिल्या. यावेळी दक्षता फाउंडेशनचे उपाध्यक्ष नितिन खापरे पाटील, सचिव शामसुंदर पाटील, सहसचिव गुड्डू सोनटक्के, कोषाध्यक्ष सुनिल वेदपाठक, विश्वस्थ पत्रकार गोविंद पाटील, नंदकुमार मानाळे, अतिक सय्यद, रोहित निकम, बालाजी माने, रणजित बरडे आदी उपस्थित होते.


जनजागृती करा

गावात जनजागृती करण्याची गरज आहे. यासाठी दक्षता फाउंडेशनचे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक राजतिलक रोशन यांनी केले. सोशल मीडियावर कोणीही आक्षपार्ह्य मेसेज टाकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कोरोनाच्या नियमांचे उल्लघन करत असेल तर तातडीने यासंदर्भात पेालिसांना माहिती द्यावी, कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.   

 
Top