मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन 


उस्मानाबाद / प्रतिनिधी -

जिल्हयातील सर्व शिक्षक संघटना प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीत कोविड१९च्या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा विकास निधी किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वइच्छेने, सहखुशीने एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन ही देण्यात आले. 

कोविड-१९ च्या दुसऱ्या टप्प्यातील महामारीने संपूर्ण जग तसेच अवघा महाराष्ट्र हवालदिल झाला आहे,कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसा गणिक वाढत चालला आहे, क्षणात होत्याचं नव्हतं करत आहे, कुटुंबाच्या कुटुंब उध्वस्त होत आहेत यामुळे शासनाला नाईलाजास्तव कडक निर्बंधासह लॉकडाऊन करावे लागले आहे.ते कधी थांबेल, पुढे किती दिवस चालेल याबाबत काहीच सांगता येत नाही.अशा स्थितीत हातावर पोट असणाऱ्या अनेक नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे एक कर्तव्य म्हणून खारीचा वाटा उचलत एक दिवसाचे वेतन जिल्हा कोविड सहाय्यता निधीसाठी  एक दिवसाचे पुर्ण वेतन  देण्यास तयार आहोत अशा आशयाचे निवेदन सादर केले आहे.

या बैठकीत लालासाहेब मगर, बशीर तांबोळी, पवन सूर्यवंशी, बिभीषण पाटील, बळवंत घोगरे, अभयकुमार यादव, नागसेन शिंदे, लहू सुरवसे, एल.बी. पडवळ, सुखदेव भालेकर, विकास मुळे, उद्धव सांगळे, राजाभाऊ गिरी, बापूसाहेब शिंदे, तय्यब अली शहा, प्रशांत माने आदींची उपस्थिती होती. 

 
Top