तुळजापूर / प्रतिनिधी : -

सध्याच्या कोरोना च्या महामारी च्या काळात ही सर्व जिल्ह्यातील च तसेच तुळजापूर तालुक्यातील निलेगाव शाळेतील शिक्षक रोज निळेगाव गावात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करत आहेत

त्या ठिकाणी जाताना गावातील सरपंच, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका ,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत प्रत्येक घरात जाऊन सर्व्हेक्षण च काम करत आहेत.

वास्तविक पाहता राज्य शासनाकडून सदरील सर्वेक्षण करण्यासाठी कसल्याही प्रकारचे साहित्य उदाहरण पी पी ई किट,मास्क, सॅनिटायझर कसल्याही प्रकारचे साहित्य प्राप्त झाले नसताना पण आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या प्राणाची काळजी घेत हे कार्य करत आहेत.

सदरील सर्वेक्षण मध्ये सर्व शिक्षक हे घरातील सर्व व्यक्तींची नावे लिहून घेऊन त्यांचा टेम्प्रेचर व ऑक्सिजन मोजून त्यांची नोंद एका रजिस्टर वर ते करून घेत आहेत आणि त्यांच्या प्रमुख व्यक्तीचा मोबाईल क्रमांक घेत आहेत।

व रोज त्यांना कॉल करून घरातील लोकांची विचारपूस करण्याच काम हे शिक्षक करत आहेत.

सदर सर्वेक्षण करण्यासाठी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा अर्जुन जाधव सर,बिट च्या विस्ताराधिकारी सौ शोभा राऊत ,शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख बळवंत सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली 

निलेगाव शाळेचे मुख्याध्यापक मा शिवाजीराव जाधव व  शाळेतील शिक्षक श्री बबन गोरे, प्रकाश जाधव, बसवेश्वर परकाळे,श्रीम शुभदा कुलकर्णी मॅडम,शिक्षक नेते श्री पवन सुर्यवंशी, गोविंद नांदे, धमे सर, गुरुलिंग ढावणे हे शिक्षक आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत.

 
Top