मुरूम / प्रतिनिधी 

मातृभूमीच्या चरणी सर्वस्व अर्पण करणारे महान देशभक्त, विचारवंत, लेखक, थोर तत्त्वज्ञ, भाषाकार आणि स्वातंत्र्यसेनानी असे बहुआयामी व्यक्तीमत्त्व हिंदू संघटक, हिंदुसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या  जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (ता.२८) रोजी मुरुम, ( ता. उमरगा) शहरातील श्रीराम जन्मोत्सव समिती व भाजप युवा मोर्चाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी गणेश डोंगरे, विकी कुलकर्णी, पृथ्वीराज गव्हाणे, अभिजीत कुलकर्णी, बबलू कुलकर्णी, कृष्णा कोरे, अप्पासाहेब कारभारी, शिवम शर्मा, शिवराज बोळशेट्टे आदी उपस्थित होते. 

 
Top