उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर शिवसैनिक हिरारौने काम करून कोरोनाच्या विषाणूंची साखळी खंडित करण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून धडक मोहीम राबविण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अखेरपर्यंत जिल्ह्यातून कोरोनाचा निपटारा करणार असल्याचा ठाम निर्धार आ. तानाजीराव सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि.१३ मे रोजी व्यक्त केला.

कुरूना संदर्भात शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाय योजना संदर्भात आढावा बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. 

यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ.कैलास पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, सुरज साळुंके, रामचंद्र घोगरे, धनंजय सावंत, दत्ता साळुंके आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आ. सावंत म्हणाले की, जिल्हाप्रमुख व शिवसैनिक यांच्या माध्यमातून ब्रेक द चैन राबविण्याची रूपरेखा आपली असून दिनांक 13 ते 31 मे या दरम्यान ही मोहीम यशस्वीपणे राबविली जाणार आहे ज्या ज्यावेळी महामारी दुष्काळ शिव जलक्रांती अशी संकटे आली त्या वेळी पक्षाच्या माध्यमातून सर्व ताकदीनिशी मदत करण्यासाठी शिवसेना ठामपणे उभा राहिले आहे त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी देखील सर्व शिवसैनिक झोपून देणार असून प्रत्येक गाव तालुकात ही मोहीम यशस्वीरित्या राबविली जाणार आहे शिवसेनेच्या माध्यमातून सेंटर उभा केली आहेत तर कोरुना रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासह अत्यावश्यक ती मदत शिवसेनेच्यावतीने पुरवून सर्वसामान्यांना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत मास्तर शनि टायझर वाटप करण्याबरोबरच नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे कोणताही अंगार आजार अंगावर न करता सर्व प्रकारच्या तपासण्या करून घेणे दुसरी लाट तीव्र असून शासन याबाबत जे धोरण राबवते ते ची अंमलबजावणी शिवसेनेच्या माध्यमातून करून हा वाढता प्रकोप थांब मिळण्यासाठी शिवसेना सरसावली आहे प्रशासनाला जे अत्यावश्यक आहे ते सर्व सहकार्य केले जाणार आहे.

राज्यात एक नंबर जिल्हा आणण्यासाठी प्रयत्न

कोरोना विषाणूंची साखळी कोणत्याही परिस्थितीत खंडित करण्यासाठी शिवसेनेने धोरणात्मक पावले उचलली आहेत. या जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी करून हा जिल्हा राज्यात एक नंबरला आणण्यासाठी प्रशासनाला शिवसेना सहकार्य करणार असून सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.

५ जूनला भैरवनाथचा ऑक्सिजन प्लांट सुरू होणार  

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखाना पाच जूनला सुरळीतपणे ऑक्सिजन उत्पादन करणार असून यामाध्यमातून उस्मानाबाद व सोलापूर या दोन्ही जिल्ह्याची ऑक्सिजनची कमतरता कायमस्वरूपी संपवणार असल्याचे आ. सावंत यांनी सांगितले.

 डॉक्टरांनी रुग्णांची लूट थांबवावी

सध्या कोरोना त्यामुळे उपचारा साठी अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होत आहेत. या ठिकाणी ७ दिवस उपचार केले जातात. उपचार झाल्यानंतर संबंधित रुग्णास पन्नास ते साठ हजार रुपये उपचाराचा खर्च घेणे अपेक्षित आहे परंतु काही खासगी रुग्णालय लाखाच्या पटीत रुग्णाकडून रक्कम पोकळीत असल्यामुळे त्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. हे थांबविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून याबाबत योग्य पावले उचलण्यात येणार आहेत.

 
Top