तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील उपजिल्हारुग्णालयात असणाऱ्या कोविड रुग्णालयातील आँक्सीजनसिलेंडर  साठा  बुधवार दि. ५ रोजी राञी ९ वाजता संपणार होता व आँक्सीजन सिलेंडर येण्यास उशीर  असा मेसेज मिळताच डाँक्टर  मंडळी हवालदिल झाले होते या कठीण परिस्थितीत  येथील डाँ श्रीधर जाधव यांनी खाजगी रुग्णालयाकडुन पाच  आँक्सीजन सिलेंडर आणण्याचे प्रयत्न सुरु केले त्याला यश मिळत असतानाच  तब्बल पावणे अकरा  वाजता आँक्सीजनसिलेंडर गाडी दवाखान्यात येताच रुग्णांचे प्राण वाचणार असे दिसताच डाँक्टर मंडळीनी सुटकेचा श्वास घेतला व संभाव्य दुर्दवी घटना टळली.

आज देशात वेळेवर आँक्सीजनसिलेंडर पुरवठा होत नसल्याचा पार्श्वभूमीवर आँक्सीजन अभावी रुग्णांचे प्राण जात आहेत असे असताना च उपजिल्हारुग्णालयातील डाँक्टर मंडळी इमरजेंन्सी प्रसंगी खाजगी डाँक्टरांन कडुन ऊसनवार आँक्सीजनसिलेंडर  मागुन आणुन रुग्णांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न येथे  होत असल्याने येथे आजपर्यत आँक्सीजन अभावी रुग्णांचा जीव धोक्यात जाण्याची वेळ आली नाही .

येथील उपजिल्हारुग्णालयात शंभर  आँक्सीजनबेड रुग्णालय असुन येथे ऐकशे सात कोरोना गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात.येथे दिवसाला ११० ते १२० सिलेंडर लागतात एका सिलेंडर मध्ये सात हजार लिटर आँक्सीजन असतो  व तो अर्धातास जातो .

येथील उपजिल्हारुग्णालयाला तामलवाडी (ता तुळजापूर) येथील आँक्सीजन कंपनीतुन आँक्सीजन सिलेंडर उपलब्ध होतात माञ बुधवारी आँक्सीजन बनविण्यासाठी लागणारे लिक्विड हैद्राबाद व पुणे येथुन येते व पुणे येथुन उपलब्ध होणारे लिक्विड उशारा येणार अशी माहीती मिळाली होती त्यामुळे येथील उपजिल्हा रुग्णालयात आँक्सीजन सिलेंडर वेळेवर मिळणार नसल्याने आँक्सीजन सिलेंडर गाडी नाही आली तर आँक्सीजन अभावी रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची शक्यता गृहीत धरुन उपजिल्हा रुग्णालयातील डाँ श्रीधर जाधव यांच्या खाजगी रुग्णालयातील डाँक्टर मंडळीकडुन पाच सिलेंडर मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले खाजगी डाँक्टरांनी ते देण्याचे मान्य करताच राञी बारा वाजेपर्यंतचा आँक्सीजन प्रश्न मिटला तरीही मनात भिती निर्माण होताच अखेर पावणे अकरा वाजता आँक्सीजन सिलेंडर गाडी दवाखान्यात पोहचताच ते उतरवुन घेवुन ते जोडले व खाजगी डाँक्टरांनी दिलेले आँक्सीजनसिलेंडर त्यांना परत केले.

 
Top