परंडा / प्रतिनिधी : - 

सेनेचे उपनेते विकासरत्न भूम-परंडा- वाशीचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी गुरुवार दि.६ रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. भेटी दरम्यान रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, औषध उपचार, नाष्टा ,जेवण,आदी सोयी सुविधा याबाबत विचारपुस केली.तसेच आरोग्य यंत्रणा व रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याबाबत आ.सावंत यांनी सूचना दिल्या. 

यावेळी मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत.जिल्हा परिषदेचे सभापती दत्ता आण्णा साळुंखे,जिल्हा प्रमुख गौतम लटके, विकास रत्न प्रा.डॉ आमदार तानाजीराव सावंत प्रतिष्ठान चे अध्यक्ष रामचंद्र घोगरे सर  तालुका प्रमुख आण्णा जाधव मा.नगरध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल ,नगरसेवक रत्नकांत शिंदे. शाम मोरेआदी सह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.  

आ.सावंत यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिल्या नंतर तालुक्यातील सोनारी येथील ५१ बेडचे प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या हस्ते “भैरवनाथ कोविड केअर सेंटरचे” उद्घाटन करण्यात आले.

ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या सतत वाढ होत असल्याने उपचार करण्यासाठी रुग्णाना हे कोरोना उपचार केंद्र नागरिकांच्या आरोग्याच्या द्रुष्टीने हिताचे व सोयीचे ठरणार आहे. 

    याप्रसंगी मा.आ.ज्ञानेश्वर पाटील, जि.प.उपाध्यक्ष  धनंजय सावंत, कृषी व पशुसंवर्धन जि.प.सभापती दत्ता (आण्णा ) साळुंखे, जिल्हाप्रमुख गौतम लटके सर,नवनाथ जगताप, अंगद आबा फडतरे सह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top