मुरुम/ प्रतिनिधी

आष्टाकासार, ता. लोहारा येथील एका अल्पवयीन मुलीवर पित्यानेच बलात्कार करून बापलेकीच्या नात्याला काळीमा फासल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेबाबत मुरूम पोलिस ठाण्यात मुलीच्या आईनेच फिर्याद गुरुवारी (ता.२९) रोजी दिल्यानंतर सदर आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटकही करण्यात आली आहे.सदर तपास जिल्हा पथकाचे कवडे यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले. 

जन्मदात्या बापानेच पोटच्या पोरीवर गतवर्षी बलात्कार केला होता परंतु सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडीतेच्या आईने त्यावेळी ही घटना झाकून ठेवली होती. परंतु पुन्हा एकदा बापानेच पोरीवर बलात्कार केल्याने या अतिसंवेदनशील अशा प्रकरणात नव्या दिशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जावे. आरोपीला कठोरात-कठोर शिक्षा व्हावी, या आशयाच्या निषेधार्थ निवेदन पोलिस कॉन्स्टेबल श्रीराम सोनटक्के, पोलिस हवलदार अमर जाधव, संदीपान कोळी यांच्याकडे गुरुवारी (दि.६) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव, शहराध्यक्ष बाबा कुरेशी, सोशल मीडिया प्रमुख व्यंकटेश खंडागळे, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष श्रीधर इंगळे आदींनी निवेदन दिले. मुरूम, (ता. उमरगा) येथील पोलिस ठाण्यात अल्पवयीन बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ निवेदन पोलिस कॉ.श्रीराम सोनटक्के यांच्याकडे देताना मोहन जाधव, बाबा कुरेशी, व्यंकटेश खंडागळे आदी.

 
Top