मुरुम  / प्रतिनिधी- 

 सध्या ग्रामीण भागात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग टाळण्यासाठी साध्या पध्दतीने विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कै. माधवराव (काका) पाटील यांची १९ वी पुण्यतिथी मुरुम शहरात शारीरिक अंतर ठेवून साजरी करण्यात आली.            

प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कै. माधवराव पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास गुरुवारी (ता.२०) रोजी प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप भालेराव, नगरसेवक महेश माशाळकर, माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर, देवणीचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे, प्राचार्य प्रविण गायकवाड, मुख्याध्यापक महादेव जिडगे, राजेंद्र गुरव, प्रा.राजकुमार वाकडे, डॉ.महेश मोटे, काकासाहेब पाटील, डॉ.सुधीर पंचगल्ले, डॉ.अप्पासाहेब सुर्यवंशी, डॉ.नागनाथ बनसोडे, डॉ.संध्या डांगे, प्रा.अण्णाराव कांबळे, प्रा.राघवेंद्र धर्माधिकारी, प्रा.सचिन राजमाने, सोहेल इनामदार, बाबा मस्के, जीवन सरपे, विलास वराडे, राजू ढगे, महादेव पाटील, मल्लू स्वामी, दत्तु गडवे, मुनीर शेख, सदानंद भोळे, प्रभाकर महिंद्रकर, महेश लिमये, लालअहमद जेवळे, मशाक कागदी, व्यंकट मंडले, इसाली चाऊस, श्रावण कोकणे, नंदू गायकवाड आदींनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन विद्यालय, मुरुम आदी ठिकाणी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी केली.                                

 
Top